माधवबाग कणकवली तर्फे हृदयरोग, मधुमेही रुणांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग कणकवली तर्फे हृदयरोग, मधुमेही रुणांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर शनिवार दि. 22 मार्च व रविवार दि. 23 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते सायं 5 वा. या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. दम, लागणे, छातीत दुखणे, पायालासूज, बायपास, अँजिओग्राफी – ॲन्जिओप्लास्टी चा सल्ला दिलेले किंवा झालेले तसेच मधुमेही रुग्णांसाठी शुगर वाढणे, पायाला मुग्या येणे ,पायाचे तळवे जळजळणे, पायाला संवेदना नसणे, इन्सुलिन इंजेक्शनचे प्रमाण वाढणे इ.लक्षणांसाठी तपासणी होणार आहे.तपासणी अंतर्गत इ. सी जी, TMT (ट्रेडमील टेस्ट), रँडम शुगर, SPO2, BP, BMI, डॉक्टर कन्सल्टेशन व आहाराविषयी मोफत सल्ला देण्यात येईल. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन कणकवली माधवबागतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क माधवबाग कणकवली मोबा. 9373183888 येथे संपर्क साधावा.

error: Content is protected !!