3 एप्रिल रोजी सेवाभावी उपक्रमांनी वाढदिवस होणार साजरा
कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस चे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांचा 3 एप्रिल रोजी 53 वा वाढदिवस आहे.अनंत पिळणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत येथे मारुती निवास या पिळणकर यांच्या निवासस्थानी 3 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे सकाळी 9 वाजता उदघाटन केले जाणार आहे. तसेच नवीन कुर्ली वसाहत येथील मारुती मंदिर व मंदिर परिसर स्वच्छता केली जाणार आहे. सायंकाळी 7 वाजता पिळणकर यांच्या मारुती निवास या निवासस्थानी केक कापून वाढदिवस साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस कणकवली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष देवेंद्र पिळणकर यांनी केले आहे.