ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या गुणवंत खेळाडूंनी कँरम स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर आपल्या विजयाची नोंद करत यश संपादन केले.या सर्व खेळाडूंचे जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे आमदार नितेश राणे यांनी कौतुक करत विजेत्यांना पुष्पगुच्छ देत सर्वांचे अभिनंदन केले.यावेळी जिल्हा बँकेचे अध्यश मनिष दळवी,संचालक प्रकाश मोर्ये,संचालक बाबा परब, प्रभाकर सावंत, संतोष कानडे, मनोज रावराणे, कँरम असोसिएशनचे सेक्रेटरी योगेश फणसळकर,खजिनदार राजेश निर्गुण,आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी राज्य विजेती कु.केशर राजेश निर्गूण,राज्य उपविजेती कु मयुरी गावडे, शालेय राज्य उपविजेती कु.प्रणीता आयरे, राज्य चतुर्थ मानांकन प्राप्त कुमार अमुल्य घाडी या सावंतवाडीतील चौघा गुणवंत खेडाळूंचे आमदार नितेश राणे यांनी अभिनंदन केले