कणकवली (प्रतिनिधी) : शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावची दुर्वा निलेश धुरी ही विद्यार्थीनी इयत्ता सातवी साठी घेण्यात आलेल्या बी.डी.एस.परीक्षेत भारतात 34 वी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आली आहे.शाळा स्तरावरील विविध परिक्षा बरोबरच शाळा बाहय विविध स्पर्धात्मक परीक्षेत दुर्वा निलेश धुरी ही सातत्याने उज्वल यश संपादित करत आली आहे. तिच्या या यशात तिच्या आई-बाबा बरोबरच प्रशालेच्या शिक्षकाचे बहुमोल मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळत आहे तिच्या या उज्वल यशा बदल संस्था अध्यक्ष मुकुंद धुरी, संस्था सचिव प्रदीप प्रभूतेंडोलकर तसेच सर्व संस्था संचालक, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष उमेश प्रभूतेंडोलकर ,प्रशालेचे मुख्याध्यापक सलीम तकीलदार सर्व शिक्षक वृंद, तसेच पंचक्रोशीतील सर्व स्तरातून कुमारी दुर्वा धुरी हिचे अभिनंदन केले जात आहे.













