कुडाळ (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली त्यातून पुढील तीन वर्षांसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली त्यातून आज पदाधिकारी निवडीची बैठक जेष्ठ कार्यकारी संचालक सतीश साळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली त्यातून सर्वानुमते पुढील तीन वर्षसाठी अध्यक्षपदी मुकुंद राघो धुरी यांची निवड करण्यात आली तर सचिवपदी प्रदीप प्रभुतेंडोलकर ,तर उपाध्यक्ष म्हणून भास्कर बाळा परब व दुय्यम सचिव म्हणून रमाकांत भगवान धुरी यांची निवड करण्यात आली यावेळी कार्यकारी संचालक मोहन सावंत,ऍड. विवेक मांडकुलकर, ज्ञानदेव चव्हाण,पद्माकर धुरी, देवेन प्रभुतेंडोलकार, दशरथ राऊळ, शांताराम धुरी, तुकाराम गोडे,जयवंत पेडणेकर तसेच शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावचे मुख्याध्यापक सलीम तकीलदार आदी उपस्थित होते. यावेळी नूतन अध्यक्ष मुकुंद धुरी यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांच्या सहकार्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातीलअनुभवाचा वापर करून अपेक्षित कार्य केलं जाईल असे सांगितले. यावेळी सर्व संचालक मंडळाकडून नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.













