खारेपाटण येथे आज स्वरोस्तव – २०२५ चे आयोजन

मराठी नव वर्षाच्या पूर्व संध्येला रानडे कुटबियांचा उपक्रम

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण रामेश्वर नगर येथील रहिवासी बँक ऑफ महाराष्ट्र सेवेतून सेवानिवृत्त झालेले बँक शाखा अधिकारी संतोष रानडे व त्यांच्या सौभग्यवती सौ दीपा रानडे व मुलगी अमिता या रानडे कुटुंबियांच्या वतीने आज शनिवार दी.२९ मार्च २०२५ रोजी फाल्गुन वद्य अमावस्या या रात्री नूतन संवस्तर स्वगता निमित्त तथा मराठी नव वर्षाच्या स्वागत प्रारंभी रात्री.९.३० वाजता संतोष रानडे यांचे निवासस्थानी “स्वरोस्तोव” – २०२५ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन न्यू रामेश्वर नगर कोर्ले – धालवली रोड,खारेपाटण येथे करण्यात आले असून या कार्यक्रमाला जास्तीत नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक संतोष रानडे यांनी केले आहे.

खारेपाटण रामेश्वर नगर येथे आज शनिवार रोजी सादर होणाऱ्या या “स्वरोस्तव” कार्यक्रमात श्रीधर पाटणकर व सौ करूना पटवर्धन यांचा गायनाचा कार्यक्रम सादर होणार असून संवादिनीची साथ चैतन्य पटवर्धन यांची मिळणार असून तबला अभिनव जोशी तर पखवाज साथ विकास नर यांची लाभणार आहे. तसेच व्हायोलिन व निवेदन उदय गोखले यांचे असणार आहे.तरी मराठी नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या “स्वरोस्तव” कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संतोष रानडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!