मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी दिले आश्वासन
वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष शरद नारकर यांनी जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांच्याशी ओरोस येथे त्यांच्या दालनात चर्चा केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वास नारकर यांना दिले. विधान भवनचे सेवानिवृत्त कक्ष अधिकारी बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. जिल्ह्यातील निवृत्त शिक्षकांची सेवानिवृत्तीनंतरची पेन्शन विक्री, सातवा वेतन आयोग हप्ता, वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलाची रक्कम आदी देयके संबंधित सेवानिवृत्त शिक्षकांची येणे बाकी आहेत. याकडे वारंवार लक्ष वेधूनही अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. ही बाब नूतन कार्यकारी अधिकारी यांच्या नारकर यांनी निदर्शनास आणून दिली. यावर चर्चा करताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सेवानिवृत्त शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन खेबुडकर यांनी नारकर यांना दिले.
