सिंधु किरणच्या वतीने आयोजन
आचरा (प्रतिनिधी) : संपूर्ण देशात सध्या गाजत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज्याच्या जीवन चरित्रावर आधारित असलेल्या ऐतिहासिक “छावा” चित्रपटाचे आयोजन छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या बलिदान दिनाच्या पूर्वसंध्येला आचरा येथील मांगल्य मंगल कार्यालय डेफोडिल्स गार्डन रिसोर्ट आचरा टेंबली येथे आयोजित करण्यात आला होता. चित्रपट पाहण्यासाठी असंख्य प्रेक्षकांची गर्दी पहावयला मिळाली.
हेमेंद्र गोवेकर, रत्नाकर कोळंबकर, बाजीराव काळे, मंदार सरजोशी, निलेश सरजोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी देवस्थान ट्रस्टी संजय मिराशी, हर्षद धुरी, अजित आचरेकर, निलेश सरजोशी, मंदार सांबारी, प्रफुल्ल नलावडे, रवींद्र बागवे, चंद्रकांत कदम, सिद्धार्थ कोळगे, वरद जोशी, विनोद देसाई, गणेश गोगटे, विद्यानंद परब, पंकज घारे आदी उपस्थित होते.














