जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी स्वतः रक्तदान करून केले उदघाटन
53 रक्तबाटल्या करण्यात आल्या संकलित
कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी स्वतः रक्तदान करून केले. पिळणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पिळणकर यांच्या नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट येथील मारुती निवास या निवासस्थानी आयोजित रक्तदान शिबिरात एकूण 53 रक्तबाटल्या संकलित करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर ,रघुनाथ कुलकर्णी, हनीफ पीरखान , नितीन म्हापणकर, प्रकाश सावंत, कणकवली तालुका युवक अध्यक्ष नयन गावडे,प्रकाश मडवी, जयेश परब , बंडू शेनवी ,सुजित सावंत, योगेश कदम , बाळा मसुरकर ,सखाराम हुंबे ,उत्तम तेली सेनापती सावंत व राष्ट्रवादी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी जीवनधारा ब्लड बँक राजारामपुरी कोल्हापूरचे पीआरओ निमेश मोरे व सहकारी स्टाफ चे सहकार्य लाभले.