बोटीवरील सर्वजण सुखरूप
मुंबई (प्रतिनिधी) : अलिबाग येथील कार्यक्रमाला मुंबईवरून जात असताना, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बोटीता अपघात तरी बोटीवरील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळते आहे. मांडवा जेट्टीजवळ पोहोचल्यावर चालकाने जेटीवर लावण्यासाठी बोट वळवली. मात्र यावेळी चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट जेटीच्या खालीत सावाला जाऊन धडकली. सुदैवाने बोटीचा वेग कमी असल्याने पावेळी मोठी दुर्घटना घडली नाही.
नंतर मात्र बोट चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवून बोट तरंगत्या तराफ्यावर सुखरूप सावली. याआधी सुद्धा उद्योग उदय सामंत यांची बोट भर समुद्रात तांत्रिक विधासामुळे बंद पडली होती. त्यावेळी तटरक्षक दलाने रेस्क्यू ऑपर भर समुद्रातून सुटका केली होती. त्यानंतर आज मांडवा जेट्टीजवळ बोटीला अपघात झाला आहे.