कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत व कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळ व छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दशावतारी नाटय महोत्सव दिनाक 5 एप्रिल, 2025 ते दिनांक 10 एप्रिल, 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम दिनांक 05/04/2025 रोजी मोरेश्वर दशावतार नाटय मंडल, मोरे. दिनांक 0६/04/2025 रोजी ऑकार दशावतार माध्य मंडळ, म्हापण. दिनांक 07/04/2025 रोजी देवेंद्र नाईक प्रस्तुत दवणकर दशावतार नाट्य मंडळ, पेंदवण. दिनांक 08/04/2025 रोजी सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर. दिनांक 09/04/2025 रोजी जय हनुमान पारंपारिक दशावतार नाटय मंडळ, आरोस. दिनांक 10/04/2025 रोजी अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, पाट असे कार्यक्रम आयोजित केले आहे.
तरी सर्व नाटय रसिकांना या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन संदेश उर्फ गोटया सावंत आणि समीर नलावडे यांनी केला आहे.












