प्रशांत कोरटकर ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यासह छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकर याला आज ऑनलाईन पद्धतीने न्यायालयात हजर करण्यात आले होते.

यावेळी कोरटकरच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. पोलिसांनी न्यायालयात त्याच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती त्यानुसार आजच्या सुनावणीत न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.त्यामुळे त्याचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे.

error: Content is protected !!