तहसीलदार, नायब तहसीलदारांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरु

आंदोलनामुळे नागरिकांची होणार गैरसोय

कणकवली (प्रतिनिधी) : राज्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना इतर विभागातील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा या मागणीसाठी राज्यभरातील 2200 नायब तहसीलदार आणि 600 तहसीलदार यांनी आजपासून (3 एप्रिल) बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची मोठी गैरसोय झाली आहे.

नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते. त्यामुळे ग्रेड पे 4300 रुपयांवरुन 4800 रुपये वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे .या आंदोलनामध्ये समिती अध्यक्ष तथा तहसीलदार श्रीधर पाटील, उपाध्यक्ष अमोल फाटक उपाध्यक्ष प्रिया हर्णे,  सचिव संतोष खरात, कोषाध्यक्ष संजय गवस जिल्हा सल्लागार प्रांत अधिकारी वैशाली राजमाने व दादासाहेब गीते संघटक आर जे पवार प्रसिद्धी प्रमुख शिवाजी राठोड व मनोज मुसळे, सहसचिव प्रदीप पवार, पावना शिंदे दर्शना कातकर, संदीप पणमंद, गंगाराम कोकरे, नागेश शिंदे , संतोष बांदेकर हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!