खारेपाटण (प्रतिनिधी) : भगवान महावीर जन्मकल्याणोस्तव निमित्त खारेपाटण येथील दिगंबर जैन समाज सेवा मंडळ खारेपाटण व वीर सेवा दल शाखा खारेपाटण आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शखा कणकवली तसेच राष्ट्रीय सेवा योजना – कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण कला यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण शिवाजी पेठ महावीर भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात एकूण ७० रक्तदात्यानी रक्तदान करून मंडळाच्या या सामाजिक उपक्रमास सहकार्य केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन खारेपाटण गावच्या सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाला कुरगवणे गावचे सरपंच श्री पप्पू ब्रम्हदंडे,जैन समाज सेवा मंडळाचे उपाध्यक्ष श्री राजेंद्र ब्रम्हदंडे,सचिव – विजय कळत्रे,श्री मोहन कावळे,निरंजन चव्हाण,शीतल कावळे,चेतन आलते, केतन आलते, विवेक ब्रम्हदंडे प्रकाश मोहिरे,मंगेश ब्रम्हदंडे,प्रज्योत मोहिरे,अक्षय ब्रम्हदंडे,प्रदीप ब्रम्हदंडे तसेच खारेपाटण महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.वसीम सैयद सर, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा कणकवलीचे कार्यकर्ते श्री ऋषिकेश जाधव, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कोल्हापूर येथील वी पी आर रुग्णालयाच्या रक्तपेढी विभगाच्या वतीने हे रक्तदान शिबिरास लागणारी संपूर्ण वैद्यकिय टीम पुरविली होती. तर खारेपाटण महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाच्या १५ विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.तर जैन समाज सेवा मंडळाच्या वतीने सर्व रकतदत्याना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह व पुषपगुच्छ देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले.