मोर्ले येथील दुर्घटनेनंतर वनविभागाविरोधात ग्रामस्थ आक्रमक
दोडामार्ग (प्रतिनिधी) : वन्य हत्तींच्या हत्त्यात अखेर 70 वर्षीय शेतकऱ्याचा बळी गेल्याची दुःखद घटना मंगळवारी सकाळी समोर आली आहे. पहाटे ७ च्या सुमारास मोर्ले येथे आपल्या मोती बागायतीत काजू गोळा करण्यासाठी गेलेल्या तक्ष्मण गवस यांच्यावर हत्तीने जीवघेणा हत्ता करत पायदळी चिरडल्याने पात त्यांच्या बरगड्या मोडून ते जागीच मृत झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटने सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून हत्तींचा हा जीवघेणा उपद्रव धांबविण्यात वनखाते व राज्यकर्ते आता तरी डोळे उघडणार आहेत का असा खडा सवात दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे. या घटनेचे वृत्त समजताच दोडामारच्या वनक्षेत्रपाल मंडल वनपाल किशोर जंगले व त्यांची टीम घटनास्थळी रवाना झाली असून घटनांचा पंचनामा करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. दरम्यान याबाबत सोर्ले गावामध्ये एकच सत्राटा असून या घटनेवर भाष्य करण्यास सध्या तरी कोणी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधी, पोलीस प्रयासन हे सद्धा मोर्ले गावी रवाना झाले आहेत. दरम्यान या घटनेनंतर तरी हत्तीना तितारी खोऱ्यात स्थिरावण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांनी हत्ती पकड मोहीम हीच काळाची गरज असल्याचे ओळखणे तितकेच महत्वाचे आहे तर जिल्ह्याच्या वनाधिकाऱ्यांनीसुद्धा जनतेच्या सहनशक्तीची परिसिमा न पाहता हत्ती पकड मोहिमेबाबत तातडीने पाऊले उचलणे आवश्यक आहेत.