उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची मागणी
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी मागणी उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केली आहे.
वैभववाडी तालुक्यात दिनांक १ एप्रिल ते ५ एप्रिल या कालावधीत विजांच्या कडकड्याचा वादळी पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील आंबा, काजू पिकाचे मोठे नुकसान केले आहे. हाता तोंडाची आलेला पीक या वादळी पावसाने जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तरी कृषी विभागाकडून ताबडतोब पंचनामे करून अपतग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे लोके यांनी केले आहे