हत्ती हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लक्ष्मण गवस यांच्या कुटुंबीयांचे मा. आम. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

केवळ एक हत्ती पकडण्याच्या आदेशाचे पत्र म्हणजे ग्रामस्थांची निव्वळ फसवणूक- वैभव नाईक

कुडाळ (प्रतिनिधी) : हत्तीच्या हल्ल्यात दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथील लक्ष्मण यशवंत गवस (वय- ६५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आज माजी आमदार वैभव नाईक यांनी गवस कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन करत विचारपूस केली आणि गवस कुटुंबियांना धीर दिला. या घटनेनंतर हत्ती पकड मोहिमेच्या आदेशाचे पत्र प्रशासनाने मोर्ले ग्रामस्थांना दिले आहे. मात्र हि ग्रामस्थांची निव्वळ फसवणूक आहे. एक हत्ती पकडून वेळ मारून नेण्याचे हे काम आहे. केवळ एक हत्ती नाहीतर इतरही हत्ती पकडले पाहिजेत. महायुती सरकार आणि प्रशासन जर एक हत्ती पकडून पुन्हा ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गप्प बसणार नाही. ग्रामस्थांना सोबत घेऊन याविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल असा इशारा वैभव नाईक यांनी दिला आहे.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, महिला आघाडी जिल्हा संघटक विनिता घाडी, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, दोडामार्ग नगरसेवक चंदन गावकर, विभागप्रमुख संतोष मोर्ये, मोर्ले सरपंच संजना धुमासकर, सिद्धेश कासार, संदेश वरक, नेहनी शेटकर, सोशल मिडीया तालुकाप्रमुख संदेश राणे, प्रेमानंद ठाकूर, शुभंकर देसाई आदींसह मोर्ले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!