खारेपाटण येथील मोफत नेत्र तपासणी शिबिराचा १७५ नागरिकांनी घेतला लाभ

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त श्री रमाकांत राऊत यांचे वतीने नेत्र शिबिराचे आयोजन

मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रिय मंत्री व विद्यमान भाजप खासदार  नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त आज गुर लवार दी.१० एप्रिल २०२५ रोजी खारेपाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा सुमारे १७५ नागरिकांनी लाभ घेतला. खारेपाटण गावचे माजी सरपंच तथा भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रमाकांत राऊत यांच्या सौजन्याने हे मोफत नेत्र तपासणी शिबिर खारेपाटण एस टी बस स्थानक शेजारी श्री कोळसूलकर कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आले होते. 

            या शिबिराचे उद्घघाटन दसकल मराठा समाजाचे युवा कार्यकर्ते श्री विजय सावंत यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी खारेपाटण माजी सरपंच तसेच आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष व भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रमाकांत राऊत यांचे शुभभस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.यावेळी  झुंझार मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री  संकेत शेट्ये,शिवसेना कणकवली उपता मलूका प्रमुख श्री मंगेश गुरव, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री संतोष पाटणकर,खारेपाटण सोसायटीचे व्हॉईस चेअरमन श्री सुरेंद्र कोरगावकर,श्री मोहन पगारे, राकेश राऊत, व वायगणी उपसरपंच श्री प्रताप फाटक,महेश राऊत, सत्यवान खांडेकर,बब्या खांडेकर, राजेंद्र राऊत,सुनील कर्ले,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.तर या नेत्र तपासणी शिबिरात एकूण २०० पेक्षा अधिक नागरीकाना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

या मोफत नेत्र तपासणी शिबिरा करीता विवेकानंद नेत्र रुग्णालय कणकवली व रेटिना सेंटर कणकवली चे विशेष सहकार्य लाभले.यामध्ये नेत्रतज्ञ श्री रमेश जगदाळे,श्रीम.प्राची चव्हाण,अर्चना दळवी यांचे पथकाने रुग्णाच्या डोळ्यांची मशिनद्वारे तपासणी करून दिली.यावेळी सुमारे

 २०० रुग्णांना मोफत चश्मा वाटप चे आयोजन भाजप कार्यकर्ते श्री रमाकांत राऊत यांच्या वतीने ठेवण्यात आले होते.

या मोफत नेत्र तपासणी शिबिराकरिता भारतीय जनता पार्टी आणि स्वामी विवेकानंद नेत्र रुग्णालय कणकवली तसेच आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व सकल मराठा समाज बांधव खारेपाटण पंचक्रोशी यांचे सहकार्य लाभले.तर सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याची  गरज ओळखून श्री रमाकांत राऊत यांनी माजी केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भरविलेले नेत्र तपासणी शिबिर ही काळाची गरज असून एका सुंदर सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून त्यांनी दादांच्या वाढदिवसाला शुभेछा दिलेल्या आहेत असे भावपूर्ण उदगार यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काढले.शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी देखील या शिबिराला भेट देऊन शुभेछा दिल्या.

error: Content is protected !!