खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिविजा वृद्धाश्रमात फळ वाटप

कळसुली माजी सरपंच अतुल दळवी यांनी सामाजिक उपक्रमांनी खासदार राणेंचा वाढदिवस केला साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त असलदे येथील दिविजा वृध्दाश्रम येथे. कळसुली माजी सरपंच अतुल दळवी यांच्या माध्यमातून फळे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. आलेल्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत नारायणराव राणे यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले तसेच वृद्धाश्रमामध्ये वयोवृद्ध असलेल्या वृद्धांनीही नारायणराव राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, असलदे उपसरपंच सचिन परब, शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, कळसुली सरपंच अतुल दळवी, नारायण दळवी, शाम दळवी, विधानसभा संयोजक संतोष जाधव, प्रदीप हरमलकर, प्रशांत परब, रघुनाथ लोके, श्रीकृष्ण वायंगणकर, असलदे बुथ अध्यक्ष संतोष परब, नांदगाव युवा बुथ अध्यक्ष मारुती मोरये, कमलाकर पाटील, उदय परब, संतोष हडकर, श्रीराम मोरजकर, महेश लोके, परशूराम परब, देवेंद्र लोके, रुपेश खरात आदी बहुसंख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!