शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाची पाहणी

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत फोंडाघाट व कोंडीये येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची तपासणी आणि पाहणी करण्यात आली. या दौर्‍यात वधाडेवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांच्या मागण्या व अडचणी जाणून घेण्यात आल्या, तसेच त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

यावेळी श्री. आंग्रे यांनी कामाची गुणवत्ता तपासून, ते अधिक दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. भोसले साहेब यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करून, रस्त्याच्या कामातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. त्यांनीही तातडीने आवश्यक बाबींची पूर्तता केली जाईल, असे आश्वासन दिले.

या पाहणीदरम्यान कोंडीये सरपंच ऋतुराज तेंडुलकर, फोंडाघाट विकास सोसायटीचे चेअरमन राजन नानचे, फोंडाघाट ग्रामपंचायत सदस्य मिथिल उर्फ पिंटू पटेल तसेच स्थानिक ग्रामस्थ संदीप भिसे, राजा तोरस्कर, सुहास पारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शासनाच्या योजनांचा लाभ स्थानिक जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा आणि रस्त्यांचे काम उत्कृष्ट दर्जाचे तसेच वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी विशेष लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांच्या हितासाठी आणि परिसराच्या विकासासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत!

error: Content is protected !!