माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवस मुंबई आणि सिंधुदुर्गात जल्लोषात होणार साजरा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह ,भाजपा कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधानपरिषद सभापती, कॅबिनेट मंत्र्यांची असणार विशेष उपस्थिती 

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : माजी आमदार प्रमोद जठार यांचा १९ एप्रिल रोजी ६० वा वाढदिवस असून हा  हीरक महोत्सवी वाढदिवस १८ एप्रिल रोजी वाढदिवसाच्या पूर्व संध्येला मुंबईत आणि १९ एप्रिल रोजी सिंधुदुर्गात जल्लोषात साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत माजी आमदार प्रमोद जठार यांचा वाढदिवस लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह राणीची बाग भायखळा मुंबई येथे साजरा केला जाणार आहे. मुंबई येथील वाढदिवस सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, विधानपरिषद सभापती राम शिंदे, सांस्कृतिक मंत्री ॲड.आशिष शेलार,उद्योगमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे,आमदार प्रवीण दरेकर, मनसे नेते बाळा नांदगावकर,शिवसेना नेते यशवंतराव जाधव, भाजपा नेते मधु चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांच्यासह अन्य दिग्गज उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त इंडियन आयडॉल अमेय दाते यांचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्याची संधी असणार आहे. भायखळा मुंबई येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुभूमी फाऊंडेशन मुंबई च्या वतीने करण्यात आले आहे.तसेच १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता  माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कासार्डे येथील निवासस्थानी हिरकमहोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.यानिमित्त अस्सल मराठमोळा कलाविष्कार उत्सव सादर केला जाणार आहे.१९ एप्रिल रोजी माजी आमदार जठर यांच्या वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमोद जठार मित्रमंडळ च्या वतीने प्रसाद जाधव यांनी केले आहे.

error: Content is protected !!