कणकवली तालुका पत्रकार पत्रकार संघाची 24 एप्रिल रोजी विशेष सभा

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सूचनेनुसार कणकवली तालुका पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारीणीची निवड गुरुवार दि. 24 एप्रिल रोजी केली जाणार आहे. यासाठी कणकवली तालुका पत्रकार संघाची विशेष सभा 24 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व सभासदांना 31 मार्च 2025 पर्यंत सभासद फी भरण्याची अंतिम तारीख होती, त्यामुळे या कालावधीत फी भरणारे कणकवली तालुक्यातील सभासद या निवड प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात असे जिल्हा पत्रकार संघाने कळवले आहे . 24 एप्रिल रोजी होणाऱ्या कणकवली तालुका पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणी निवडीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून संतोष सावंत व महेंद्र मातोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .तरी या विशेष सभेला सर्व सभासदांनी उपस्थित राहावे अशी विनंती अध्यक्ष अजित सावंत, सचिव माणिक सावंत तसेच कणकवली तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने करण्यात आली आहे.

error: Content is protected !!