वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सोमवार १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता माणिकचौक ( छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याजवळ ) येथे ” धर्मवीर बलिदान मास ” पाळणारे श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक यांचा सत्कार करण्यात आला .
सर्वप्रथम छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर रा.स्व.संघाचे बाबुराव खवणेकर सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्या नीच क्रूर वृत्तीच्या औरंग्याने तब्बल ४० दिवस यवन यातना देऊन छळ करीत मारलं. त्या प्रित्यर्थ ही मुले फाल्गुन शुध्द प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजेच २८ फेब्रुवारी ते २९ मार्च असा महिना आपल्या धाकल्या धन्याचं म्हणजेच शंभूराजांच्या बलिदानाचं सुतक श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक पाळतात.
यामध्ये श्रावणी गोकाककर, निधी परब, मानस परब, ओजस परब, गोविंदा कोळी, देवांग जगताप, यशराज कोयंडे, धारकरी प्रज्वल कोयंडे, सौ. प्रियांका कोयंडे
तसेच मठ कावलेवाडी येथे धारकरी तेजसराव देसाई,साहिल परब,शुभम परब, आदिनाथ धर्णे हे सर्व निस्वार्थ धर्मवीर बलिदान मास पाळतात.
यामध्ये विशेष म्हणजे आजच्या फॅशनच्या युगात सुद्धा श्रावणी गोकाककर, निधी परब व सौ. प्रियांका कोयंडे ह्या ताई सर्वस्व निश्चयाने पायात चप्पल न घालता धर्मवीर बलिदान मास पाळतात. या सर्वांनी संपूर्ण एक महिना पायात चप्पल न घालणे, मुंडण करणे ,चहा गोड पदार्थ न खाणे,मांसाहार न करणे ,आवडीची गोष्ट न करणे,शुभ प्रसंग टाळणे हे त्याग केले आहेत. तसेच दररोज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन दिवा लावून व शंभूराजेंना पुष्प अर्पण करुन श्री संभाजीसुर्यहृदय श्लोक म्हणून त्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगितला जातो.व ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र म्हटले जाते.
यावेळी सत्कार मुर्तींचे प्रतिनीधी प्रज्वल कोयंडे यांनी आपल्या मनोगतात म्हणाला कि , धर्मवीर बलिदान मास हा प्रत्येक हिंदुधर्मियांनी पाळणे आवश्यक आहे. कारण ज्यांच्या बलिदानामुळे आज आपल्या मंदिरात देव,घरात देव्हारा आणि अंगणात तुळस,आई,बहिण,मुलगी,पत्नी यांच्या कपाळावर कुंकू आहे.आज जे आपण हिंदू म्हणून जगतोय कारण आपल्या राजांनी आपल्या धर्मासाठी जे भोगलंय ते जगात कुणीच केलं नसेल.याची जाणीव प्रत्येक हिंदूला व्हायला हवी.सुदैवाने आता छावा चित्रपट प्रदर्शित झालाय,त्यामुळे उभ्या जगाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान समजत आहे .पण श्री शंभूराजांचे बलिदान वाचून,ऐकून व चित्रपट पाहून समजण्याएवढे स्वस्थ नाही ते जाणून घेण्यासाठी पाळावा लागतो तो धर्मवीर बलिदान मासच.ह्या मुलांची प्रेरणा घेऊन असंख्य मुलांनी धर्मवीर बलिदान मास पाळला पाहिजे आणि सध्याची परिस्थिती पाहता ही काळाजी गरज बनली आहे, म्हणूनच हिंदुधर्माभिमानी मंडळींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .यावेळेस असंख्य हिंदुधर्माभिमानी मंडळी उपस्थित होती .