खारेपाटण केंद्र शाळेत सदिच्छा भेट
खारेपाटण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्याच्या एकंदरीत सर्वांगीण विकासात शालेय शिक्षणा बरोबरच नृत्यकला देखील महत्वाची असून कला शेतत्राकडे देखील वळावे.असे भावपूर्ण उदगार झी मराठी टी व्ही वरील “एकापेक्षा एक ” डान्स पर्वातील अंतिम विजेते आणि प्रसिद्ध डान्स कोरोग्राफर सॅड्रिक डिसोजा यांनी खारेपाटण येथील जि.प.केंद्र शाळा खारेपाटण मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना काढले.
यावेळी जि प केंद्र शाळा खारेपाटण नं.१चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष पाटणकर माता पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष सौ प्रियंका गुरव,समिती सदस्या सौ संध्या पोरे शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर पदवीधर शिक्षिका श्री अर्चना तळगावकर,श्री संजय राऊळ, सहायक शिक्षिका श्रीम रेखा लांघी, श्रीम.अलका मोरे,श्रीम रुपाली पारकर, आदी मान्यवर पदाधिकारी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
खारेपाटण केंद्र शाळेला आज डान्स कोरोग्रफर सॅड्रिक डिसोजा यांनी सदिच्छा भेट दिली. व येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व आपल्या आगमी डान्स कार्याशाले विषयी माहिती दिली. खारेपाटण जि.प केंद्र शाळा ही सुंदर व देखणी संस्कारमय शाळा असून एखाद्या कॉन्व्हेन्ट शाळेला देखील मागे टाकेल अशी त्याची ठेवण व रचना आहे.त्यामुळे अशा आदर्श शाळेला भेट देण्याचा योग आला. हे मी माझे भाग्य समजतो. अशी देखील प्रतिक्रिया सॅड्रिक डिसोजा यांनी यावेळी दिली.