कणकवली पं.स.च्या शिरपेचात मानाचा तुरा

यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान मध्ये कोकण विभागात तृतीय क्रमांक ; ६ लाखांचे बक्षीस

सांघिक यश – गटविकास अधिकारी अरुण चव्हाण

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पंचायत समिती च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून कोकण विभागात कणकवली पंचायत समितीने तृतीय क्रमांक प्राप्त करत ६ लाखांचे बक्षीसही पटकावले आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या जोरावर कणकवली पंचायत समितीने हा बहुमान मिळवला आहे. कणकवली पंचायत समिती ne मिळविलेले हे यश सांघिक असून यापुढेही राज्यात कणकवली पंचायत समिती अग्रेसर राहील असा विश्वास गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी व्यक्त केला.राज्यातील विकासाच्या प्रमुख योजना या पंचायत राज व्यवस्थेमार्फत राबविल्या जातात. पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन आणि विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ना यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.सन २०२२-२३ आर्थिक वर्षात केलेल्या कामांचे मूल्यमापन करून पुरस्कारांची घोषणा राज्य सरकारच्या वतीने ६ मे रोजी करण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

गटविकास अधिकारी अरुण चव्हाण

error: Content is protected !!