फोंडाघाटचा हरहुन्नरी निवेदक उमेश कुशे यांचे अल्पशा आजाराने निधन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील लोकप्रिय ग्रामस्थ उमेश कुशे (५३) यांचे अल्पशा आजाराने रहात्या घरी दुःखद निधन झाले.भाजी व्यावसायिक, डेकोरेटर आणि मिळेल त्या कामांमध्ये त्याचा हातखंडा होता. विविध मंडळांच्या विनोदी निवेदनात त्याचा सहभाग असे. सर्वांना मदत करणे, यामुळे तो सर्वांचा लाडका होता त्याच्या निधनामुळे मित्र परिवारामध्ये दुःख व्यक्त होत आहे. त्याच्यापेक्षा पत्नी व दोन मुले आहेत. अंत्ययात्रेत उपस्थित राहून सर्वांनी त्याला श्रद्धांजली वाहिली.

error: Content is protected !!