वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतीय सेनेनं पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे तब्बल नऊ तळ उध्वस्त करत भारतीय सेनेनं ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते केली आहे. ऑपरेशन सिंदूर विजयाचा वैभववाडी भाजपच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला. भाजपा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला. यावेळी भारत माता की जय च्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
यावेळी वाभवे – वैभववाडी नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे,बंड्या मांजरेकर,नेहा माईणकर, प्राची तावडे,संजय सावंत,अतुल सरवटे,विवेक रावराणे, प्रदीप नारकर, रणजीत तावडे,आशिष रावराणे,अतुल नारकर, राजन तांबे, दत्ताराम सावंत, अवी साळुंखे,उदय पांचाळ,अनंत आमरसकर,शिवाजी राणे,उमेश पवार,श्री मोहिते, श्री.रावराणे,अनंत फोंडके व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












