फोंडाघाट हायस्कूलची यशस्वी परंपरा कायम !

प्रशालेत राज अजय परब प्रथम, आयर्न नानचे द्वितीय, आणि काव्या भोगले तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कोकण विभागीय शिक्षण मंडळ, रत्नागिरी मार्फत फेब्रुवारी/ मार्च २५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करीत बारावी पाठोपाठ, दहावीच्या परीक्षेचा निकाल 100% लावण्यात यश प्राप्त केले. प्रविष्ट झालेल्या 108 विद्यार्थ्यांपैकी 108 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत ३३ उत्तीर्ण झाले.त्यामुळे प्रशालेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये राज अजय परब यांनी 94.80% मार्क मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर आर्यन नानचे 93.80% मार्क मिळवून द्वितीय आणि काव्या भोगले 93.60 गुण मिळवून तृतीय क्रमांकाने पास झाले.

नव्वद टक्के मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गोविंद बालेघाटकर 93 :40, दुर्वा रेवडेकर 93, पारस रासम 91:80 सार्थ बिडये 92.80, सलोनी तेली 91.80, केदार सामंत 91.60,लाड हितेश 91 90.80, साडीम 90:40, अंतरा मरे90:40,मानसी सावंत 90:20, साधना चव्हाण 90, दुर्वेश लाड 90, अशा गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

उत्तीर्ण परीक्षार्थींचे आणि मुख्याध्यापक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे, संचालक- न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट आणि ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!