नळ योजनेची मोटार जळल्यामुळे नाधवडे बौद्धवाडीत पाणी टंचाई

वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे बौद्धवाडी येथील नळ योजनेची मोटार जळल्यामुळे गेले आठ दिवस येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नळ योजनेची तात्काळ दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

नाधवडे बौध्दवाडीला पाणी पुरवठा करणारी स्वतंत्र नळयोजना आहे. सोमवारी १९ तारीखला नळयोजनेची मोटारमध्ये बिघाड झाल्यामुळे नळयोजना बंद पडली आहे. त्यामुळे नळयोजनेच्या विहिरीत मुबलपाणी साठा असूनही नागरिकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे.मे महिना असल्यामुळे वाडीत मोठ्या प्रमाणात चाकरमानी आलेले आहेत. त्यातच कार्यक्रमांचे दिवस असल्यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. तरी नळयोजनेची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.

पाणी टंचाई बाबात नाधवडे सरपंच लीना पांचाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, वाडीच्या नलायोजनेसाठी दोन मोटार आहेत. मात्र विजेच्या कमी अधिक दाबामुळे त्या दोन्ही मोटार जळल्यामुळे त्या दुरुस्तीसाठी दिल्या आहेत. रविवारपर्यत पाणी पुरवठा सुरळीत सुरु होईल.

error: Content is protected !!