ट्रक विदयुत पोलवर कोसळल्याने महावितरण ला मोठे नुकसान
फोंडाघाट (प्रतिनिधी) : विजापूरहून सावंतवाडी या ठिकाणी तयार मिक्स सिमेंट चा टँकर भरलेला घेऊन जाणारा कंटेनर ट्रक क्रमांक एम एच झिरो आठ ए पी ६६१५ याला काल सकाळी सहाच्या दरम्यान मोठा अपघात झाला असून करूळ काच कारखाना स्टॉप च्या दरम्यान सदर कंटेनर ट्रक आला असताना समोरील येणाऱ्या वाहनाला साईड देत असताना साईड पट्टी खचून रस्त्याच्या साईडला कलंडला. सदरचा कंटेनर ट्रक बाजूच्या लाईट पोलवर कोसळल्याने ह्या लाईट पोलच्या आजूबाजूचे तीन पोल वाकल्याने जवळपास चार गाळ्या मधील विद्युत वाहिनी तुटून करूळ बौद्ध वाडी कडे जाणारा विद्युत प्रवाह सुमारे ४० तास बंद होता यामुळे तील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागला.
दरम्यान सदरच्या अपघातामुळे विद्युत वितरणचे सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याने फोंडाघाट महावितरणचे प्रभारी शाखा अभियंता बिडकर यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त ट्रक चालक व ट्रक मालक विदयुत महावितरण चे झालेले नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याने शाखा अभियंता बिडकर यांनी कणकवली पोलीस यांच्याकडे ट्रक चे मालक पराग जोग यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
दरम्यान अपघातात लाईट पोलवर कोसळलेला कंटेनर ट्रक दुसऱ्या दिवशी दुपारी करेन च्या सहाय्याने काढण्यात आला