माजी पं स उपसभापती सुचिता दळवींना पतीशोक
कणकवलीb(प्रतिनिधी) : कणकवलीत फ्लायओव्हर वर ट्रक दुचाकी च्या आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या अपघातात कळसुली येथील भाजपा कार्यकर्ते शामसुंदर दळवी ( वय 72 ) यांचा मृत्यू झाला. शामसुंदर दळवी हे कणकवली पं स च्या माजी उपसभापती सुचिता दळवी यांचे पती होत. शामसुंदर दळवी हे जाणवली हून फ्लायओव्हर वरून वागदे च्या दिशेने स्वतःच्या ताब्यातील दुचाकी ने चुकीच्या दिशेने जात होते. त्याच वेळी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक ला दळवी यांच्या मोटारसायकल ची धडक बसली. अपघातानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जात दळवी याना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी दळवी हे मृत झाल्याचे घोषित केले.दळवी यांच्या पश्चत पत्नी, मुलगी असा परिवार आहे.