कनेडी हायस्कूलचा लक्ष्मण हर्णे ची नवोदय विद्यालयासाठी निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी हायस्कूल प्रशालेमधील इयत्ता आठवी मधील विद्यार्थी कु. लक्ष्मण प्रसाद हर्णे याची शैक्षणिक वर्ष 2025/26 पासून जवाहर नवोदय विद्यालय सांगेली, सावंतवाडी येथील केंद्रीय अभ्यासक्रमासाठी बारावी पर्यंतसाठी निवड झाली आहे.

यासाठी कुमार लक्ष्मण याला प्रशालेतील उपक्रमशील शिक्षक प्रसाद मसुरकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले असून त्याच्या या सुवर्णमय यशानिमित्त संस्था अध्यक्ष सतीश सावंत,सरचिटणीस शिवाजी सावंत आणि सर्व संचालक, शालेय समिती चेअरमन आर एच सावंत आणि सर्व सदस्य, मुख्याध्यापक दळवी, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विदयार्थी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!