माजी नगरसेवक संताजी रावराणे यांचा उपक्रम
वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस वाभवे वैभववाडी नगरपंचायतचे माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी महाराणा प्रताप कलादालन येथे विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा केला. यावेळी तालुक्यातील 50 वयोवृद्ध नागरिकांचा वॉकिंग स्टिक व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वैभववाडी तालुक्यातील दहावी व बारावी मधील विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच, भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. नगरपंचायत वाभवे वैभववाडी हद्दीतील सर्व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटपही यावेळी करण्यात आले. त्यासोबतच नगरपंचायत मधील सफाई कामगारांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. वाभवे वैभववाडी नगरपंचायतचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते संताजी रावराणे हे गेली 9 वर्षे सातत्याने मंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करत असतात. पदावर असो वा नसो ते नेहमी निस्वार्थी भावनेने हा उपक्रम राबवत आले आहेत. त्यामुळेच नितेश राणे यांच्या सच्चा कार्यकर्ता अशी आपली ओळख त्यांनी निर्माण केली आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, भाजपा वैभववाडी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बॅंक संचालक दिलीप रावराणे, वाभवे नगरपंचायत नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, भाजपा जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे, माजी भाजपा तालुकाध्यक्ष नासीरभाई काझी, प्राची तावडे, महिला तालुकाध्यक्ष शारदा कांबळे माजी जिल्हा समाजकल्याण सभापती, माजी सभापती वैभववाडी अरविंद रावराणे, माजी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, माजी नगराध्यक्षा नेहा माईनकर, नगरसेविका सानीका रावराणे, माजी जिल्हा बॅंक संचालक दिगंबर पाटिल, माजी उपनगराध्यक्ष संजय सावंत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अतुल सरवटे, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, हुसेनभाई लांजेकर, पुंडलिक पाटील भाजपा तालुका उपाध्यक्ष, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, रोहन रावराणे शिक्षण सभापती वाभवे नगरपंचायत, विवेक रावराणे नगरसेवक वाभवे, करूळ सरपंच नरेंद्र कोलते, शिवाजी राणे तालुका शहर अध्यक्ष, वाभवे शहर अध्यक्ष आशिष रावराणे, स्वप्नील धुरी, भाजपा कार्यकर्ता आदि सर्व भाजपा शक्तिकेंद्रप्रमुख कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते. यावेळी प्रमोद रावराणे यांनी आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या तसेच भालचंद्र साठे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी आभार अरविंद रावराणे यांनी मानले व सूत्रसंचालन रजब रमदुल उंबर्डे यांनी केले.












