कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनामार्फत राज्याचे “एकल महिला धोरण” तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्या अनुषंगाने २३ जून रोजी साजरा होणारा “आंतराष्ट्रीय विधवा दिन” हा “एकल महिला दिवस” म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाणे कणकवली नगरपंचायत, दीनदयाळ जन आजीविका योजना– शहरी (DJAY-S), महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने मंगळवार 23 जून रोजी सकाळी 11 वा. नगरवाचनालय हॉल कणकवली येथे “आंतराष्ट्रीय विधवा दिन “ ( International widow Day) हा “एकल महिला दिवस “ म्हणून साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमामध्ये कणकवली शहरातील सर्व एकल महिलांच्या समस्या, अडचणी तसेच शासनाकडून अपेक्षित उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध पेन्शन योजना एकल महिलांना रोजगार, स्वयंरोजगार व उपजिविकेच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी शहरातील जास्ती जास्त एकल महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे व मार्गदर्शनचा लाभ घ्यावा. असे आवाहन कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील व नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केल आहे.
कणकवली नगरपंचायतमार्फत “एकल महिला दिवस” होणार साजरा











