इन्सुली उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बांदा (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग पथकाने अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतूक करणारी स्विफ्ट कार पकडून सुमारे 8,05,040 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बांदा-डाणोली रस्त्यावर, गाव विलवडे येथील चर्च समोर, ता. सावंतवाडी येथे दि. 18/06/2026 रोजी सकाळी 06.00 वाजताच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क पथकाने तपासणी केली. त्यावेळी मारुती सुझुकी कंपनीचे पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन क्र. MH-02-CP-2909 हे तपासणीसाठी थांबवले.
वाहनाच्या मागील सीटवर व डिक्कीमध्ये भरलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे एकूण 35 बॉक्स इतका अवैध मद्यसाठा मिळून आला. सदर गुन्ह्यामध्ये एकूण अंदाजे 4,55,040 रुपये किमतीचे मद्य आणि मद्यसाठा वाहतुकीसाठी वापरण्यात आले मारुती सुझुकी कंपनीचे पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन क्र. MH-02-CP-2909 अंदाजे किंमत 3,50,000 रुपये असा एकूण अंदाजे 8,05,040 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे: वाहन चालक – संतोष मुरलीधर नागरे, वय 37 वर्षे, रा. पिंपळगाव बहुला, जि. नाशिक रविंद्र भाऊसाहेब शिंदे, वय 33 वर्षे, रा. रेठगाव, ता. चांदवड, जि. नाशिक
सदर कारवाई महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई डॉ. राजेश देशमुख, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, पी. पी. सूर्ये, सह आयुक्त, अंमलबजावणी व दक्षता, विजय चिंचाळकर, विभागीय उपआयुक्त, कोल्हापूर विभाग, कीर्ती शेठे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत मिलिंद माळी, दुख्यम निरीक्षक, धनंजय साळुंखे, दुख्यम निरीक्षक, विवेक कदम, दुख्यम निरीक्षक, रणजीत शिंदे, जवान, दिपक वायवडे, जवान, सतिश चौगुले, जवान, सागर सूर्यवंशी, जवान, व अभिषेक खत्री, जवान यांनी सहभाग घेतला
पुढील तपास मिलिंद माळी, दुख्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली करत आहेत.











