सुपारी व जास्वंद वृक्ष वाटपातून ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश: पर्यावरणपूरक उपक्रम
आचरा (प्रतिनिधी) : आचरा वरचीवाडी येथील श्री. बाळगोपाळ मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळातर्फे कुटुंबांना 120 सुपारी व जास्वंद वृक्षांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून “झाडे लावा, झाडे जगवा” हा पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.जेष्ठ सभासद विष्णू लाड यांचा हस्ते शनिवारी सकाळी वृक्षारोपण करण्यात आले. बाळगोपाळ मंडळाचे अमृतमहोत्सवी हे वर्ष विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांनी साजरे केले जात आहे.कर्यक्रम साजरे करत असताना यातून सामाजिक बांधिलकी व ऐकतेचा संदेश दिला जातो.
यावेळी श्री देव रामेश्वर वैभवशाली पतसंस्था संचालक व मंडळाचे माजी अध्यक्ष वामन आचरेकर मंडळाचे अध्यक्ष मंदार आचरेकर, उपाध्यक्ष महेंद्र आचरेकर, सचिव विलास आचरेकर, खजिनदार पंकज आचरेकर यांच्यासह महेश शेट्ये, संदीप चव्हाण, अक्षय लाड, सौ. मनाली आचरेकर, ज्येष्ठ सल्लागार विष्णू लाड, शिवराम शेट्ये, रामदास आचरेकर, श्रीकृष्ण लाड, विजय लाड, संजय आचरेकर, शिवराम आचरेकर, ओमकार आचरेकर, मंगेश आचरेकर, संतोष आचरेकर, प्रथमेश शेट्ये, प्रकाश लाड, विशाल आचरेकर, दीपक आचरेकर, मनस्वी आचरेकर, मंगल घाडी, निशिगंधा भिरवंडेकर, प्रेमा आचरेकर, निकिता आचरेकर, विद्या जाधव, प्रिया आचरेकर, दीपा लाड, विभावरी लाड, रुचिता आचरेकर, उर्मिला लाड, ममता आचरेकर, शैलेश शेट्ये, नितीन आचरेकर, योगेश बागवे, वैभव कोदे, ओमकार भिरवंडेकर तसेच मंडळाचे सर्व संचालक व सदस्य उपस्थित होते.अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे आचरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी स्वागत केले असून पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले











