पुर्नतपासणीनंतर व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल बांदा चा दहावी परीक्षेचा निकाल जाहीर

बांदा (प्रतिनिधी) : येथील व्ही.एन नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल बांदा प्रशाळेचा दहावी परीक्षेचा पुर्नतपासणी नंतर चा निकाल जाहीर झाला. दहावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर या प्रशाळेतील काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने पुर्नतपासणीसाठी निकालासाठी पाठवण्यात आला होता. हा निकाल पुन्हा एस. एस. सी बोर्डाने ऑनलाईन पद्धतीने पाठवला आहे. पुर्नतपासणीनंतर काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे. नवीन पुर्नतपासणीनंतरचा व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल बांदा प्रशाळेचा निकाल खालील प्रमाणे आहे. दुर्वा मुनेश वारंग ९९.२० प्रथम, अनुष्का रामचंद्र तेली ९६.०० द्वितीय, सुयश संदीप गावकर ९५.४० तृतीय, साक्षी भूषण गवंडी ९४.६०, वेदा सुनील सावंत ९४.२०, सान्वी सागर राऊळ ९०.८०, तन्वी सुभाष दळवी ९०.६०
यशस्वी विद्यार्थ्यांचे मंगेश कामत चॅरिटेबल ट्रस्ट चे चेअरमन मंगेश कामत तसेच मुख्याध्यापक मनाली देसाई, शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, शालेय समिती उपाध्यक्ष दिवाकर मावळणकर यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!