खारेपाटण येथे मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित १० वी/१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

शिवसेना पक्ष व यश कॉम्प्युटर यांचे आयोजन

“विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य गुणांना वाव देऊन प्रगती करावी…”- रुहीता तांबे

खारेपाटण (प्रतिनिधी) : “विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःमध्ये असलेलेले उपजत गुण व कला कौशल्याचा योग्य वापर करून आपली प्रगती करावी.” असे भावपूर्ण उदगार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती रुहीता तांबे यांनी खारेपाटण हायस्कूल येथे यश कॉम्प्युटर अकॅडमी व शिवसेना पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त शनिवार दि.२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या १० वी /१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना काढले.
या कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए डी कांबळे, खारेपाटण हायस्कूल पर्यवेशक संतोष राऊत, ॲडव्होकेट विशाल जाधव, खारेपाटण जि.प.केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगेश ब्रम्हदंडे, रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष दयानंद कोकाटे, ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री गुरसाळे, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुहास राऊत, संगणक शिक्षिका फरिदा पटेल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ समाज कल्याण सभापती रुहीता तांबे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी शिवसेना पक्ष खारेपाटण व यश कॉम्प्युटर यांच्या वतीने खारेपाटण पंचक्रोशीतील १० वी /१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समाज कल्याण सभापती रुहीता तांबे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तर नामदार नितेश राणे यांनी आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यातील पहिला AI जिल्हा म्हणून घोषित करून विद्यार्थ्यांचा शिक्षणाबरोबरच रोजगार संधी निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले. अशा या दूरदृष्टी असलेल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करणे हे आपले कर्तव्य असल्याचे उदगार यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी काढले. यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीने समाजकल्याण सभापती रुहीता तांबे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तर खारेपाटण जि.प.केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांचा देखील सेवा निवृत्त होत असल्याबाबत शिवसेना पक्षाच्या वतीने सभापती रुहीता तांबे यांच्या शुभहस्ते शाल श्रफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार खारेपाटण ज्युनियर कॉलेजच्या शिक्षिका दर्शन पाताडे यांनी केले.

error: Content is protected !!