“पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आजची तरुण पिढी अंमली पदार्थ सेवनाच्या विळख्यात सापडत आहे” -मंगेश पेडणेकर

चौके (प्रतिनिधी) : पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आजची तरुण पिढी अंमली पदार्थ सेवनाच्या विळख्यात सापडत आहे.अंमली पदार्थांच्या सेवनामुळे समाजात गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत आहे. आणि त्याचा एकंदरीत समाजावर विपरीत परिणाम होत आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी अंमली पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक उपाय व अंमली पदार्थांचे दुष्परिणाम याबाबत समाजात जनजागृती करणे हे प्रभावी मार्ग आहे असे प्रतिपादन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, गोवा चे इन्स्पेक्टर मंगेश पेडणेकर यांनी येथे बोलताना केले.

अंमली पदार्थांच्या विळख्यातून तरुणाईची सुटका व्हावी, निर्व्यसनी सक्षम पिढी घडावी, व्यसनाधीनतेशी संबंधित प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती व्हावी या उद्देशाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो गोवा यांच्यावतीने १२ जून ते २६ जून या कालावधीत “अंमली पदार्थ विरोधी जनजागृती” मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा, संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, वराडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कट्टा व वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने “अंमली पदार्थ विरोधी जनजागृती” कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री पेंडणेकर हे बोलत होते यावेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो गोवा चे कॉन्स्टेबल सुशील कुमार,शिजीन एन. के. , वराडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य रविंद्र गावडे, महाविद्यालयाच्या एन.एस.एस विभाग प्रमुख प्रा.सिद्धी नेरुरकर,एन.एस.एस. विभाग सहाय्यक प्रा.श्रुती कुंभार, मिलिंद कदम, नामदेव मासी, आदी उपस्थित होते

यावेळी मंगेश पेडणेकर व मोहन राणे यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. तसेच यानंतर कट्टा बाजारपेठ येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली देखील काढण्यात आली. यावेळी बाजारपेठेतील नागरिकांना अंमली पदार्थ विरोधी जनजागृती माहिती पत्रकांचे वितरण देखील करण्यात आले.
या जनजागृती मोहिमेत तिनही युनिटचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते. जनजागृती व्याख्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मिलिंद कदम यांनी केले.

error: Content is protected !!