देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेल्या खतांचे वाटप करण्यात आले यात काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असून उर्वरित शेतकऱ्यांना या खतांचा तुटवडा सिंधुदुर्ग जिल्हासहित देवगड तालुक्यात भासत त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीची कामे मोठ्या प्रमाणात रखडली जात आहेत प्रसंगी खाजगी विक्रेत्या अधिक दराने या खतांची विक्री करत असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त असलेले खते लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावीत अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत, नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने देवगड
तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
पालकमंत्री ठेके देण्यात मग्न, सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांबाबत उदासीनता












