कणकवली (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने कणकवली व परिसरातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी (B.E.) प्रवेश प्रक्रियेची सुलभ माहिती उपलब्ध व्हावी यासाठी कणकवली येथे प्रवेश सुविधा केंद्र सुरू केले आहे. पारकर सृष्टी अपार्टमेंट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मराठा मंडळ रोड, कणकवली येथे हे केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. या प्रवेश सुविधा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना कॅप राउंड नोंदणी, प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती, विविध शिष्यवृत्ती योजना तसेच अभियांत्रिकीच्या विविध शाखांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग तसेच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या शाखांमध्ये प्रवेश उपलब्ध आहे.__कणकवली व परिसरातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी दूरवर जावे लागू नये, त्यांचा वेळ व खर्च वाचावा तसेच स्थानिक स्तरावरच सर्व माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने हे प्रवेश सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शनासह प्रवेश प्रक्रियेतील सर्व टप्प्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या केंद्राचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९७६७१११९७० किंवा ९६०४२७२५६६ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कणकवली प्रवेश सुविधा केंद्र सुरू….











