खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील नव्याने स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ खारेपाटणला रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3170 चे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटेरियन राजेशजी घाटवळ यांनी नुकतीच रुपये २१००० /- ची देणगी जाहीर केली असून वेंगुर्ले येथे आयोजित रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ले मिडटाऊन च्या सन २०२५ – २६ च्या स्थापना दिन कार्यक्रमात त्यांनी ही देणगी जाहीर केल्याचे सांगितले.
रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे प्रेसिडेंट रोटेरियन दयानंद कोकाटे, सेक्रेटरी रोटेरियन अजय गुरसाळे, रोटेरियन डॉक्टर उमेश बालन यावेळी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या सर्व रोटरी परिवाराकडून डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेशजी घाटवळ यांचे आभार व्यक्त करण्यात आले असून या निधीतून शैक्षणिक व सामाजिक कामे करण्याचा निर्धार यावेळी रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या वतीने व्यक्त करण्यात आला.












