कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव तलावाच्या काठावर पर्यटकांना बसण्यासाठी माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्या मागणीनुसार कलमठ गावचे सुपुत्र ऍड.सुमेध सतीश नाडकर्णी यांनी आपल्या परिवारातील व्यक्तींच्या स्मरणार्थ पाच बैठक व्यवस्था प्रदान केली तसेच कलमठ चे ग्रामदैवत श्री काशी कलेश्वर व हनुमान मंदिर येथेही पाच बैठक व्यवस्था प्रदान केली. त्यांच्या या दानशूरपणामुळे गावातील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बबली राणे, सुमित नाडकर्णी, विनायक अपराज, हेमंत तांबे, राहूल आंगणे, गणेश, अपराज, मयूर सावंत, बोर्डवे गावचे मानकरी जगन्नाथ मोडक व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते, पर्यटकांची गरज ओळखून नेहमीच तलावासाठी प्रयत्नशील असणारे बबली राणे यांनी आपल्या माध्यमातून काही ना काही तरी तलावाच्या विकासासाठी काम करत असतात, त्यांच्या प्रतिसादाला मित्रमंडळींकडून पाठिंबा मिळतो, गावाच्यावतीने नाडकर्णी परिवाराचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले. व समाधान व्यक्त करण्यात आले.