देवगड (प्रतिनिधी) : भागिरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान विरार पालघर (महाराष्ट्र) यांच्या वतीने भागीरथी राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारांचे वितरण देवगड येथील उमाबाई बर्वे वाचनालयात शनिवार दि ८ एप्रिल रोजी करण्यात आले. यामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा देवगड जामसंडे शहर अध्यक्ष दयानंद शामराव पाटील यांनी केलेल्या सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना तसेच देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगरसेविका अँड प्रणाली मिलिंद माने यांना
भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान विरार पालघर या संस्थेच्या वतीने भागीरथी राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले . या पुरस्कार वितरण माजी आमदार अँड अजित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले. या संस्थेचे अध्यक्ष दिनेश भोईर व सचिव अंकुश भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.