सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे जिल्हातील गुणवंतांच्या सत्कार सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : यशाची वाट सोपी नसते कारण आपल्याला यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. कारण संघर्षा शिवाय यश नसते आणि संघर्ष करून जे यश मिळते त्याचा आनंद वेगळा असतो. ज्या स्पर्धेत उतरतो त्या स्पर्धा समजून घेतल्या पाहीजेत. स्वतःच्या क्षमता ओळखणे हेच यश असते. आजच्या युगात यश मिळवता तेव्हा तुमच्या सोबत असणारी माणसे ही आपली संपत्ती आहे. तुमच्यात जी क्षमता आहे तीच ओळखून वाटचाल करणे गरजेचे आहे असे प्रतिप्रादन आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडीच्या प्रा. संजिवनी पाटील यानी केले. श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ, नांदगांव, नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था व सरस्वती हायस्कूल नांदगाव याच्या संयुक्त विद्यमाने जिल्हातील गुणवंतांच्या सत्कार सोहळयात सरस्वती हायस्कुल नांदगावच्या सभागृहात बोलत होत्या. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन नाट्य-सिने कलाकार गणेश रेवडेकर यांच्या शुभहस्ते करण्या आले. यावेळी प्रा. संजिवनी पाटील, अध्यक्ष नागेश मोरये, मुख्याध्यापक सुधीर तांबे, नांदगाव विकास मंडळाचे अध्यक्ष गजानन रेवडेकर, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, सोसायटी चेअरमन भगवान लोके, शिवाजी लोके, श्रीधर मोरये, प्रसाद अंधारी, मारूती मोरये, केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, मंगेश तांबे, पोलीस पाटील ऋषाली मोरजकर, मनोहर खोत, रज्जाक बटवाले आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. पाटील म्हणाल्या, सत्कार सोहळ्यात बोलावले हा माझा आनंद आहे. यशवंताची कौतुक करणारी ही एकमेव संस्था आहे. आपल्या यशाची वाट आपणच करावी लागते. तंत्रज्ञान आले तर ते आपल्याच मुठीत आहे. तुमची क्षमता व कौशल्य समजते तेव्हाच मोठे व्हाल. आपल्याकडील कौशल्य प्रगत होते तेव्हाच यशाची पायरी गाठू शकता. आजची पीढी मोठी होते त्याचा भावनांचा विकास कीती होते हे पाहिले पाहीजे. तुमची गुणवत्ता यशाचा मार्ग पार कराल यासाठी यशात अहंकाराला थारा देऊ नका. क्षमता कौशल्य ओळखा सत्य सुंदर मूल्ये जोपासा असे मार्गदर्शन केले यावेळी नागेश मोरये म्हणाले, गेली 40 वर्षे आम्ही गुणवंताचा सत्कार करतो. यामुळे आज अनेक शाळांची प्रगती होत १०० टक्के निकाल लागला आहे. पुढची पिढी शिकावी यासाठी माझे प्रयत्न आहेत यासाठी तरूण मंडळीना पुढे यावे. पालक व मुलांनी मेहनत घेतल्यास नक्कीच प्रगती होते. यावेळी स्नेहा बर्वे, विधी चिंदरकर, प्रसाद अंधारी, रविराज मोरजकर, चंद्रकांत डामरे, गजानन रेवडेकर, सद्गुरू कुबल, भगवान लोके यानी मोनगत व्यक्त केली. दरम्यान जिल्ह्यातील प्रथम क्रमांक चैतन्या सावंत, आर्या राणे, श्रेयस बर्वे, व्दितीय क्रमांक नक्षत्रा काळे तृतीय ध्रुव तेंडूलकर, विधी चिंदरकर, स्मितेश कडोलकर, हर्षदा हडलगेकर, रेश्मा पालव व नांदगाव प्रशालेतील मंदार हडकर, अवनी बोभाटे, सेजल मोरये याच्यासह शिवाजी लोके, चंद्रकांत डामरे याचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार संजय सावंत यांनी मानले. शाळेला कधीही विसरू नका: नाट्य-सिने कलाकार गणेश रेवडेकर

शिक्षकाचे महत्त्व आपल्या आयुष्यात महत्त्वाचे आहे प्रत्येक क्षेत्रात गुरूला ओळखायला शिका गुरुजनांना आदर करा याचबरोबर शाळेला कधीही विसरू नका. कारण माझ्या यशात माझी शाळा होती. प्रयत्नांची कास धरून वेळ मिळेल तेव्हा शाळेत जा. आपल्या गगनभरारी रक्तातच असावी लागेते तरच कुठल्याही क्षेत्रात गेल्यावर गरूडझेप घेता येता. समोरच्याला समान वागणूक द्या. तुम्ही आपोआप मोठे व्हाल असे म्हणत कणा कविता सादर केली.

error: Content is protected !!