खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण शिवाजी पेठ येथील प्रतिष्ठित व्यापारी व खारेपाटण जैन समाज सेवा मंडळाचे कार्यकर्ते तसेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे खारेपाटण येथील सक्रिय कार्यकर्ते मंगेश ब्रम्हदंडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा सिंधू कृषी उत्पन्न बाजार समितीवर नुकतीच बिनविरोध निवड झल्यामुळे खारेपाटण येथे शिवसेना पक्ष कार्यालयात खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या शूभहस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
खारेपाटण येथील शिवसेना पक्ष संपर्क कार्यालय तथा उद्योजक किरण उर्फ भैया शेठ सामंत यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कणकवली उपतालुका प्रमुख श्री मंगेश गुरव खारेपाटण ग्रा.म.सदस्य श्री गुरूप्रसाद शिंदे,सुधाकर ढेकणे, अस्ताली पवार,सामाजिक कार्यकर्ते, देवानंद ईसवलकर,सुहास राऊत,खारेपाटण व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष प्राजाल कुबल आदी मान्यवर उपस्थित होते.
मंगेश ब्रम्हदंडे यांचा खारेपाटण ग्रामस्थ व शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुषपगुच्छ देऊन सरपंच प्राची इसवलकर यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.