ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग पुणे च्या माध्यमातून

खारेपाटण कॉलेजमध्ये प्लंबिंग व्यवसायामध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध

खारेपाटण (प्रतिनिधी) : ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पाइपिंग,पुणे या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून व खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण यांच्या सहकार्याने खारेपाटण दशक्रोशितील विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षापासून प्लम्बिंग शिक्षण या अभ्यासक्रमाची सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिली असून या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी केले आहे.

प्लम्बिंग मधील तज्ञांच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी औपचारिक शिक्षण आणि कौशल्य विकास प्रदान करून,प्लम्बिंग मध्ये डिप्लोमा अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी ज्ञानदा इन्स्टिट्यूट गेली १२ वर्ष कार्यरत आहे. या इन्स्टिट्यूट मध्ये प्लम्बिंगमध्ये दोन महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध बांधकाम कंपन्या, रिअल इस्टेट डेव्हलपर्स, हॉटेल्स यामध्ये प्लंबर म्हणून काम करता येते. तसेच एक उत्तम स्वयंरोजगाराचा मार्ग या संस्थेच्या माध्यमातून पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला जात आहे.तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यवसायभिमुख अभ्यास करून देण्यासाठी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ नेहमीच कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून चालू शैक्षणिक वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नर्सिंग असिस्टंट व प्लम्बिंग व्यवसाय अभ्यासक्रमाची उपलब्धता करून देण्यात येत आहे.

तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन आपल्या उत्तम करिअरची सुरुवात करावी असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात येत आहे.

error: Content is protected !!