चिंदर लब्देवाडी येथे अनिल लब्दे यांच्या घरावर पडले झाड..!

सुमारे 42000 हजाराचे नुकसान

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर लब्देवाडी येथील अनिल वसंत लब्दे यांच्या घरावर वादळीवाऱ्याने शनिवारी पहाटे जंगली झाड कोसळले. मोठा आवाज झाल्याने अनिल लब्दे गडबडून जागे झाले. सुदैवाने घराच्या जेवण करण्याच्या भागावर झाड कोसळले. या मध्ये कोणतीही दुखापत नाही.

घटनेची खबर मिळताच तलाठी आकाश कराळे आणि पोलिस पाटील सोनाली माळगांवकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून सुमारे 42000 हजाराचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

error: Content is protected !!