एसीबी च्या खटल्यात न्यायालयीन कोठडीतून पोलीस कोठडी मिळण्याची दुर्मिळ घटना
लाचखोर सहाय्यक अभियंता पाटील वर निलंबनाची टांगती तलवार
़अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी, रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : वीज कनेक्शन देण्यासाठी 30 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेला विजतवीतरण चा सहाय्यक अभियंता अमित आप्पासाहेब पाटील यांची न्यायालयीन कोठडीतून दोन दिवसांसाठी एसीबी च्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याकामी सरकारी अतिरिक्त अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला तसेच सरकारी वकील रुपेश देसाई यांनी तोडकरी याना साहाय्य केले. विजवीतरण च्या देवगड तालुक्यातील वाडा शाखेतील सहाय्यक अभियंता अमित पाटील यांना 30 हजारांची लाच घेतल्याच्या गुन्ह्यात एसीबी च्या पथकाने रंगेहाथ पकडून 7 एप्रिल रोजी जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी जिल्ह्या न्यायालयाने आरोपी अमित पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. एसीबी चे डीवायएसपी कांबळे यांनी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी अमित पाटील यांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी जिल्हा सत्र न्यायालयाकडे केली होती.आज जिल्हा सत्र न्यायालयासमोर पोलीस कोठडी मिळण्याबाबत झालेल्या सुनावणीत सरकारी अतिरिक्त अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी जोरदार युक्तिवाद करत लाचखोर लोकसेवक आरोपी अमित पाटील यांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. सरकारी अतिरिक्त अभियोक्ता तोडकरी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की लोकसेवक आरोपी अमित पाटील यांचा लाचलुचपत घेण्याचा पूर्वेतिहास आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सेवेत असताना आरोपी पाटील यांना कोल्हापूर एसीबी ने पकडले होते आणि तो खटला अद्याप सुरू आहे.तसेच आरोपी अमित पाटील याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे एसीबी पथकाला त्यांच्याकडे तपास करणे बाकी असून कुठलेही पुरावे हस्तगत करता आलेले नाहीत. या गुन्ह्याचा तपास प्राथमिक अवस्थेत आहे. आरोपी चा मोबाईल जप्त करणे आवश्यक आहे, आरोपीच्या आवाजाचा नमुना घेणे आवश्यक आहे. लाच स्विकारण्याच्या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे किंवा कसे याचाही तपास होणे आवश्यक आहे. तोडकरी यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत जिल्हा सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी आरोपी अमित आप्पासाहेब पाटील याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. एसीबी च्या खटल्यात आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्या नंतर पोलीस कोठडी सुनावण्याची ही दुर्मिळ घटना आहे. दरम्यान 7 एप्रिल पासून न्यायालयीन कोठडीत असलेला आणि पुढे 2 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलेला लाचखोर सहाय्यक अभियंता अमित पाटीलवर खात्यांतर्गत निलंबनाची कारवाई ची टांगती तलवार आहे.