अरुळे येथील श्रीधर गणपत अरुळेकर यांचे निधन 

वैभववाडी (प्रतिनिधी) : अरुळे बौद्धवाडी येथील सेवानिवृत्त डेप्युटी डायरेक्टर (जीपीओ )श्रीधर गणपत अरुळेकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी भांडुप मुंबई येथे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.भांडुप मुलुंड परिसरातील सहकारी गृहनिर्माण संस्था व नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील अग्रणी, दी आंबेडकर एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद नाईट हायस्कूलचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम केले आहे. वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन उभारणीत मोलाचे योगदान होते.त्यांच्या पश्चात मुलगा चार मुली सुना जावई नातवंडे असा परिवार आहे

error: Content is protected !!